या अनोळखी शहरात...
या अनोळखी शहरात...
1 min
66
या अनाेळखी शहरात, शिकण्या मी आलाे,
येथेच घेतले घर, मी स्थिर स्थावर झालाे...
या अनाेळखी शहरात,माझे लागेबांधे जुळले,
शहराने दिला राेजगार,जगण्याचा भाग झाले...
या अनाेळखी शहरात, आेळख वाढली सर्वदूर,
या शहरानेच माझा, पालटवला एकूण नूर...
या अनाेळखी शहरात, देताे सहकार्याचा हात,
संकटे,अडचणींवर करताे,मी आता धीराने मात...
