कृष्णभक्त
कृष्णभक्त

1 min

272
कृष्णाचे रूप
त्याच्या लीला,
मोहवतात प्रत्येकाला...
कृष्णाचे प्रेम
त्याचे ज्ञान,
सौंदर्याची खाण...
भक्त कृष्णमय
मनोहर बासरीवाला,
अवघा गोपाळकाला...
कृष्णभक्तीचा गोडवा
म्हणजे मिरा,
कृष्ण सहारा...
कृष्णभक्तीचा चेहरा
झाला सूरदास,
दरवळला सुवास...
जिथे कृष्ण
राधा तिथे,
प्रेमाने पाहते...
कृष्णाचा परममित्र
उद्धव झाला,
गोकुळात धाडला...
महाकवी जयदेव
कृष्णगान गातो,
रसकाव्य लिहितो...