STORYMIRROR

Deepak Ahire

Others

2  

Deepak Ahire

Others

वारी...

वारी...

1 min
36

विविध गावापासून पदयात्रा, म्हणजे असते वारी,

धार्मिक व सांस्कृतिक परंपरा,नेमाने वारी करतो वारकरी...

वारकऱ्यात नसतो कधीही, लहान मोठा असला भेद,

आदर आणि श्रध्देचा, असतो प्रत्येकाच्या मनात छेद...

वारकरी घालतात, गळ्यात तुळशीच्या माळा,

स्नान करूनी भाळी, लावतात गोपीचंदनाचा टिळा...

बंधन, मोहातून व्हावे मुक्त, पांडुरंगाचे करावे नामस्मरण,

वारकरी संप्रदायाने सांगितले, हेच परमार्थाचे कारण...

वारीच्या दरम्यान रिंगण, हात धरुनी होतात गोलाकार,

धावतो माऊलीचा अश्व, तेव्हा होते श्रद्धेय संकल्पना पार...

वेळापूरपासून करतात धावा, पंढरपूरपर्यंत धावतात,

विठ्ठलाच्या दर्शन ओढीने, वारकरी पटापट चालतात...


Rate this content
Log in