STORYMIRROR

Sandeep Jangam

Inspirational

3  

Sandeep Jangam

Inspirational

दिपावली

दिपावली

1 min
378

दिपावलीचा लावूनी दिवा..

सुखं समृद्धी घेऊनी यावा..

प्रकाश उजळूद्या हर्षाचा..

गोडवा जपूया नात्याचा..

आस्वाद घ्यावा चिवड्याचा..

खमंग चवदार चकलीचा..

अलगद उचला लाडूला..

नका म्हणून करंजीला..

होऊ भाग सर्वांच्या सुखाचा..

करू भार हलका त्यांच्या दुःखाचा..

थाट नसे नशिबी श्रीमंतीचा..

गरिबीतच नांदे वास लक्ष्मीचा..

आपल्यासम व्हावी दिवाळी..

छत्र हरपले जयांचे संकट काळी..

अंगणी त्यांच्याहि असावी रांगोळी..

एक घास त्यांनाही सकाळी सकाळी..

आपणच व्हावं प्रकाशमान..

उजळूनी टाकण्या तयांचे जीवनमान..

कीर्ती पसरुद्या आपली परिसासमान..

निरंतर व्हावा आपला मान सन्मान..

आपणांस व आपल्या कुटुंबीयांस...

दिपावलीच्या शुभेच्छा.. छानच छान..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational