STORYMIRROR

Sandeep Jangam

Romance

3  

Sandeep Jangam

Romance

साखर चुंबन.. चांदणीच

साखर चुंबन.. चांदणीच

1 min
182

काल तू माझ्या गालावर 

ओठ टेकविलेस 

अन माझ्या अंगा खांद्यावर 

नक्षत्रांचा वर्षाव झाला 


तूझ्या साखर चुंबनांना 

मर्यादा हवी होती 

तशी वागण्याची पद्धत 

मला नवी होती 


तू कानाजवळ पुटपुटलास 

आज मी चांदणं प्यालो 

तू मला गाल दिलेस 

मी तुला काय देऊ? 


खरं तर माझे गाल 

माझ्याजवळच आहेत 

तू दिलेले तुझे ओठ 

सांग मी कशी परत देऊ? 


अलगद चुंबता चुंबता 

वर्षाव करीत गेलास 

वक्षावरून ओघळत कधी 

ओष्ठयमृत पीत गेलास 


मिठी किती घट्ट 

एकरूप केलंस मला 

बाजूला कसं व्हायचं 

कळलंच नाही मला 


माझ्या वाचून जगणं 

तुला जमेल काय? 

की तुझेही अडकलेत 

माझ्या काळजात पाय?


धुंद पहाटे वेळी

मंद श्वास घेताना 

तूझा साखर चुंबनाचा वर्षाव 

रोमरोमी भिनताना 


जग सारे झोपले असता 

नभीचा चंद्र साक्षीला 

चांदणी सोबत चंद्र असावा 

तसा तू माझ्या साथीला 


वारा किती शांत 

पहाट पेंगुळली होती 

बाकी काही नव्हते जवळ 

घट्ट तुझी मिठी होती 


किती वेळ गुंफले हात 

नि:श्वासासह हळुवार सोडले 

ओठांनी ओठांना पिऊन घेत 

हातानी गात्रनगात्र झोडले 

 

चढत जाणारा दिवस 

पाखरांची किलबिल होती 

मनाच्या क्षितीजावर तेव्हा 

फक्त प्रीतीची लाली होती...

फक्त प्रीतीची लाली होती...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance