Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mangesh Karkare

Inspirational Others

3  

Mangesh Karkare

Inspirational Others

पहिली भाऊबीज

पहिली भाऊबीज

1 min
344

तो एकटा पोरका

कोणी नाही जिवलग

कधी उरी अचानक

त्याच्या असे तगमग

रानवट वृक्षापरी 

तो वाढला सहज

आता तरारून आला

कळू लागे प्रेम,लाज । 1 ।

तो मिसळे लोकात

कधी हसतो खेळतो

रात्र उदास असते

निद्रेसाठी तरसतो

सणवार येती जाती

याला सगळे पारखे

सुख दुःख हार जीत

जणू सगळे सारखे । 2 ।

यंदा भाऊबीज दिनी

एक शेजारची पोर

याच्या दाराच्या समोर

रांगोळीते चंद्रकोर

तिन्ही सांजेला जवळ

दोन पणत्या लावते

त्याच्या नकळत त्याची

अशी दिवाळी सजते । 3 ।

एका बेहोशीत जणू

तो बाजारात गेला

 रंगीतशा कागदाचा

तिच्या हाती पुडा दिला

तिच्या म्हाताऱ्या आईने

एक दीप तेजाळला

पहिला भाऊबीज सण  

आज दोघात सजला ।4 ।

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational