STORYMIRROR

Mangesh Karkare

Others

3  

Mangesh Karkare

Others

हृदयात झिरपो ओलावा

हृदयात झिरपो ओलावा

1 min
379

दिवाळी

सण दीप दिव्यांचा

अंधारातून प्रकाशाकडे

जाण्याचा

अंधार म्हणजे 

नुसता प्रकाश नसणे-

असे नाही...

अंधाराच्या शंभर तऱ्हा

तुम्हीच तुमच्या मनाला विचारा


दुःख हटवा

दारिद्र्य मिटवा

भेटेल त्याला

सहज हसवा

आणि असे कितीतरी

साठून ठेवावे उराउरी

आता आणि इकडेही पहा...


दीप,ज्योत,अनंत दिवे

जुने जुने,नवे नवे

फटाक्यांचे नाना प्रकार

एक नवे विश्व साकार

नवी खरेदी,ओढ नव्याची

तिखट गोड जपाव्यात रुची

असा अवघा आनंद

दिवाळीचा आगळा छंद


आणि एक कोपरा हळवा

मनोमनी सतत जपावा

हृदयात झिरपो ओलावा

त्याचा विसर कधी नसावा

पर दुःख जगावे

त्यातही आपण मिसळावे

जशी हवा ,वारा जसा

आकाश भरून ठेवी तसा

तसाच अनाम तेवता दीप

सरते दिवाळी पण...

ज्योत अमीटअगदी समीप।।


Rate this content
Log in