महामानवास अभिवादन
महामानवास अभिवादन
ज्ञान होते भरपूर
परिस्थिती होती गरीब
जातीपातीचा भेद केला दुर
वंदन करू महामानवाला
भुख नव्हती पोटाची
मारली उंच भरारी
ग्रंथ पुस्तक विद्येची
ज्ञानाच्या जोरावर
नायक तु भारताचा
तीनशे कलमी संविधान
तु शिल्पकार घटनेचा
निर्माण केला भारताचा सन्मान
महापरिनिर्वाण दिनी
आस हीच मनी
यावास तु पुन्हा जन्मुनी
हीच आमची आशा
