जगण्याची आशा
जगण्याची आशा
योगा आहे जगण्याची आशा
शिकवी जगण्याची भाषा
योगा आहे आरोग्याचे स्थान
योगाने होते आयुष्याचे भान
निरोगी रहायचे तर करा योग
आजाराचे दुर सरतील भोग
सुर्य नमस्कार रोज करूया
सुर्यासम तेजस्वी होऊया
ताण, तणाव आणि क्रोध
ध्यान धारणेचा होईल बोध
सर्व रोगांवर रामबाण उपाय
योगा आहे एक उत्तम पर्याय
करा प्राणायाम व कपालभाती
नियंत्रण ठेवा श्वसनावरती
योगात आहे प्रचंड शक्ती
मानवात निर्माण होते आत्मशक्ती
