दीवाळीचा क्षण
दीवाळीचा क्षण
सण आहे दीपावली
दिवे लाउ दारोदार
रांगोळी काढू अंगनी
फराळ बने घरोघरी
पहिला दिन वसूबारस
पूजा करु गाईची
दिवस आहे सुखद
माया आहे आईची
दुसऱा दीन धनतेरस
आरोग्य लाभावे सर्वांना
जिवन जगा सुंदर
दिवाळी जावो आनंदी सर्वांना
तिसरा दीन लक्ष्मीपूजन
करू पूजा लक्ष्मीची
घरोघरी लक्ष्मी असे
वेळ आहे धन संपत्ती जपण्याची
चौथा दीन भाऊबीज
नाते बहीण भावाचे
गोडवा आहे मनाचा
सुखद क्षण जीवनाचे
