संघर्ष
संघर्ष
बास पुरे झाले आता रडत बसणे
आयुष्याचा संघर्ष थांबणार नाही
उठ जागा हो आता मेहनत कर
सहज तुझं ध्येय तुला मिळणार नाही
घाबरून पाठीमागे हटून
तुला काही मिळणार नाही
मिळवायचंच असेल आयुष्यात काही
दिवसरात्र कष्टाशिवाय पर्याय नाही
उठ घट्ट पाय रोव उद्याच्या दिवसासाठी
तुझा आजचा संघर्ष उद्याचं भविष्य घडवणार
माघार घेऊ नकोस हिम्मत ठेव
एक दिवस तुझ्या कीर्तीचा प्रकाश सगळीकडे उजळणार
