आयुष्य एक काव्य
आयुष्य एक काव्य
आयुष्य एक काव्य
जसे मानाल तसे
सुख दुःख साथ ते
तुम्ही बघाल जसे.
काव्य आनंद देते
शब्द शब्द रचावे
मनसोक्त लिहून
छान काव्य बनावे.
सुखाला ते स्मरावे
दुःखाला विसरावे
काव्यात ते रमुनी
आनंदात जगावे.
संगीत साथ काव्य
आवडे ते मनास
संगितात रमुनी
तुप्ती लाभे जिवास.
बघा रचुनी काव्य
जुळवा ते यमक
कविता बनवुनी
दाखवा ती चमक.
