ये ये रे पावसा
ये ये रे पावसा
निसर्गाच्या असमतोलात साथ असुद्या पांडुरंगा तुमची!
पावसाच्या सरींनी मिळु द्या भाकरी तुमच्या आशीर्वादाची!!
काबाड कष्ट करून शेतकरी राजा कसतो शेती!
उद्या पाऊस येईल की नाही याची सदैव असते मनात त्याच्या भिती!!
चुकला असेल मानव जरी, चुकला नाही मुका प्राणी !
तहान भागव त्या प्राण्यांची देवा, तुझ्या पावसाच्या सरींनी!!
सगळ्यांनी धरावी आस आता वृक्ष लागवडीची !
अन्यथा तहान भुकेने व्याकुळ होऊन, सर्वाना वाट मिळेल स्वर्गाची!!
एक व्यक्ती एक झाड लावू या !
आणी धरणीमातेला हिरवा शालू चढवु या !! मगच होईल बदल निसर्गाचा, वर्षांव होईल पावसाचा!
किलबिलाट होईल पक्ष्यांचा, शेतकरी राजा सुखावेल, मिळुनी मोबदला पिकांचा !!
