STORYMIRROR

Devakee Dhokane

Inspirational Others

3  

Devakee Dhokane

Inspirational Others

ज्ञानज्योती

ज्ञानज्योती

1 min
261

स्त्री शिक्षणाचे दारे खुली करण्या जन्मली एक माऊली,

निराधारांना जिने दिली मायेची साऊली!

जात-पात, धर्म -पंथ याला जराही थारा न दिला तिने,

स्व:त दगड, शेण -चिखलाचा मारा सहन केला तिने!

जुनाट रूढी, परंपरा, प्रथा स्व:त मोडून काढल्या,

सुशिक्षत होऊन स्नी शिक्षणाचा नाव मार्ग शोधला!

 स्व:त ज्ञानज्योती होऊन समाजात ज्ञानाचा दिवा लावला,

ज्याचा प्रकाश चहूकडे पसरला!

सदा वंदनीय, पूजनीय, आम्हां 

ज्ञान देणारी ज्ञानज्योती,

जिने समाजात घरोघरी तेवत ठेवली ज्ञानाची पणती! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational