STORYMIRROR

Devakee Dhokane

Fantasy Others

3  

Devakee Dhokane

Fantasy Others

कॉलेज सोडून जाताना...

कॉलेज सोडून जाताना...

1 min
910

कॉलेज सोडून जाताना

पुन्हा नव्याने आठवेल कॉलेजचा पहिला दिवस

अन कॉलेजला येण्यासाठी केलेला प्रवास


कॉलेज सोडून जाताना

पुन्हा नव्याने आठवेल कॉलेजमधल लेक्चर

अन विद्यार्थ्यांबरोबर मनमोकळेपणाने वागणारे टिचर  


कॉलेज सोडून जाताना

पुन्हा नव्याने आठवतील जिवाभावाच्या मैत्रिणी

अन न थांबणारी त्यांची वाणी


कॉलेज सोडून जाताना

पुन्हा आठवतील लायब्ररी मधील पुस्तके

अन शिक्षकांनी भानावर आणलेली मस्तके


कॉलेज सोडून जाताना

पुन्हा नव्याने आठवेल मैत्रिणींबरोबर केलेली मस्ती

अन कडू गोड प्रसंगात कायम साथ देणारी दोस्ती  


कॉलेज सोडून जाताना

पुन्हा आठवेल रिक्षाची वाट पाहत झाडाखाली बसून 

केलेल्या टाईमपास

अन मनाला घरी जाण्यासाठी लागलेली आस  


कॉलेज सोडून जाताना

पुन्हा आठवेल रात्र -रात्र जागून केलेला स्टडी

अन् एक्स्ट्रा सप्लीमेंट लावणारी बडी


कॉलेज सोडून जाताना

पुन्हा आठवतील सर्वांचे पाणावलेले डोळे

अन कॉलेजच्या आठवणींचे सोहळे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy