STORYMIRROR

Devakee Dhokane

Tragedy Fantasy Inspirational

3  

Devakee Dhokane

Tragedy Fantasy Inspirational

ती...

ती...

1 min
342

ती अजूनही तशीच आहे, 

जशी लग्न करून घरी आली होती, 

अगदी तशीच ...

स्वतःच अस्तित्व विसरून 

आपल्या कुटुंबाच्या अस्तित्वासाठी 

झटणारी, लढणारी, 

सूर्यांच्याही अगोदर उठणारी 

आपली आवड -निवड जपण्यासाठी 

तिला कधी सवडच नसते , 

आपल्या कुटुंबाची आवड -निवड 

जपण्यातच ती गुंग असते...

कुटुंबापुढे 'ती' म्हणजे काहीच नसते, 

कारण तिच कुटुंब म्हणजे 'ती'च असते 

कुटुंबाची जबाबदारी पेलताना, 

ती अतोनात कष्ट झेलत असते, 

तरीही ती हसतमुखाने सगळ्यांशी 

बोलत असते...

'ती'च्या अस्तित्वाची जाण 

आपल्याला असायला हवी, 

एखाद्या वस्तूप्रमाणे तिला वागणूक नसावी 

आपलं अस्तित्व निर्माण करता -करता 

आपण तिच अस्तित्व तर पुसत नाही ना !

याचं भान ठेवायला हवं...

कारण...

ती अजूनही तशीच आहे, 

जशी लग्न करून घरी आली होती, अगदी तशीच...

'ती'ची कहाणी, 

प्रत्येक 'ती'ला समर्पित..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy