चावी ...
चावी ...
1 min
292
क्षणात बदलून जाते सारे
मग काही वेगळेच होतात
समोरचे नजारे
बदल हा निसर्गाचा नियम
अन नात्यांमध्येही दिसतो तो कायम
प्रत्येकजण आपापल्या
पध्दतीने जगत असतो ,
कधी कधी आपल सोडून
इतरांचही बघत असतो
जीवनचक्र हे असाच चालू राहणार ,
मग त्यात माणसं येणार अन जाणार
ज्याची त्याची भूमिका
ज्याला त्याला समजायला हवी ,
कारण तीच आहे तुमच्या आयुष्याची चावी …