STORYMIRROR

Devakee Dhokane

Tragedy

3  

Devakee Dhokane

Tragedy

आकाश अजूनही मोकळेच आहे...

आकाश अजूनही मोकळेच आहे...

1 min
243

आकाश अजूनही मोकळेच आहे, 

कारण उडणाऱ्या पाखरांचे पंख छाटले आहे, 

कुणाला ते आपले शिकार वाटले आहे, 

कुणी त्याचे दुकानच थाटले आहे. 

पाखरांना आता भीती वाटते आकाशी उडण्याची...

क्रूर शिकार्‍याशी दोन हात करण्याची...

निरागस पाखरं पिंजर्‍यात गुदमरताय,

आकाशी झेप घेण्याची नवी स्वप्न डोळ्यात भरताय...

झेप घेण्या अगोदरच त्यांना खाली ओढले जाते, 

अन् पिंजर्‍याचे ओझे त्यांच्यावर लादले जाते !

 म्हणूनच...

आकाश अजूनही मोकळेच आहे, 

कारण उडणाऱ्या पाखरांचे पंख छाटले आहे, 

कुणाला ते आपले शिकार वाटले आहे, 

कुणी त्याचे दुकानच थाटले आहे. 

आकाश अजूनही मोकळेच आहे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy