STORYMIRROR

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

चंद्र

चंद्र

1 min
219

तो

पहा 

गगनी

उगवला

पूर्ण चंद्रमा

उजळली

प्रकाश

कला ....


कोणी म्हणे चंद्र , कोणी म्हणतो त्यास शशी

कोणी जोडतो नात्यांची युक्ती ती नामी

हरएका भासतोच तो सखा

मित्रत्व नाते , येते कामी

गुजगोष्टी करतो

अंतरयामी ....


ती 

आली

नभात

चंद्रकोर

प्रतिपदेस

 मना मोद

होतसे

थोर ....


होतोच पूर्ण लोप , अवसेच्याच दिवशी

प्रकाशे चंद्रकोर प्रथम दिनाला

कलेकलेनेच वाढत जातो

चंद्र देतो मोद मनाला

उत्सुक हो मनात

मी दर्शनाला ....


तो

झाला

समय

उगवला

पूर्ण चंद्रमा

पौर्णिमेच्या

संध्येस

आला


प्रकाशाने उजळलीच ती धरणी माता

सुखाची भासे , उगवली निशा आज

पूर्ण चंद्राची ती प्रभा पसरे

भासते चढविला साज

चंद्राभोवती चांदण्या

तो सरताज .....


ही

सारी

किमया

निसर्गाची

चंद्र व सूर्य

ही देणगी

साजरी

त्याची ....


भगवंताची असेच ही हो करणी न्यारी

किती शोध लावले माणसाने जरी

तरी न कळे , त्या करणी सारी

बिघडे ते माणूस करी

परी निसर्ग देई

भाग्याच्या सरी ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational