STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

चाकरमाने

चाकरमाने

1 min
249

शहरातील चाकरमाने असतात खूप खूपप्रेमळ

जगताना त्यांचे आयुष्य जगतात साधे नि सरळ 

मायाजाळ सोडावा लागतो पोटाच्या खळगीसाठी  

धकाधकीचा काळ असतो सदैव त्यांच्या पाठी 


वेळेची सोबत त्यांना जीवनात सतत घ्यावीच लागते 

त्यांच्यातील आयुष्यात दोघांना वचनबद्ध रहावे लागते 

कधी,कधी त्यांना दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न आहे 

कधी,कधी त्यांना खाजगी नोकरीचा कडक वचक आहे 


त्यात भरडले जातात,मित्रप्रेम,स्नेहबंध नात्याचे 

त्यात दोष काय कष्टमय शहरातील चाकरमान्याचे 

त्याला प्रश्न असतो दररोज गंभीर जीवन जगण्याचा  

कुटुंबाला जगवण्याचा आणि मायबाप सांभाळण्याचा 


हे जर का खेड्याने सामान्य गरीबाला दिले असते 

खेडूतानी आपली सुंदर गावे काहो सोडले असते 

तिथे असतो काही निर्ढावलेल्या लोकांचा भयान धाक 

गाव विकासाचे खोटे नाटक करून खेडे केले जाते खाक 


पोटाला चिमटा घेऊन चाकरमाने जातात लग्नकार्याला 

त्रासाचा व महागड्या प्रवासाचा हिशोभ नसतोच कुणाला 

ऊलट बोंबाबोंब होते, काय आणले हो त्यांनी आम्हांला 

मानपान,आदर सारे नसतात चाकरमान्यांच्या नशिबाला 


तोडले जाते रक्ताचे नाते, आपसात दुरावा कायमचा 

हिसाब केला जातो त्यांच्या कार्याचा, वारंवार जाण्याचा 

रुसवे, फुगवे, जिरवा जिरवी स्पर्धा ग्रहण लागते नात्याला 

 त्यातच बरबाद होते जीवन पैसा आणि जमीन जुमला 


भूमीहीन चाकरमाने जगतात तुटपुंज्या पगारावर 

जगणे असते अवघड पण समस्या असतात भाराभर 

अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य सारे असते विकत 

तरीही माणूस संघर्षाच्या विळख्यात सदा असतो जगत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational