जन्माष्टमी
जन्माष्टमी
अगदी होते ते तुमच्या सारखे, मनाने बालिश आणि प्रेमळ ,
तेव्हा त्यांच्या हातात असे विरंगुळा म्हणुन बासरी केवळ.....
दूध, दही,लोणी, आवडे त्यांना प्रचंड,
आणि ते खाऊनच शत्रूंना देई मापदंड.....
मित्रता त्यांची सुदामा संग, प्रेमाचे वारे राधा संग,
अगदी तुमच्या सारखे खोड्या पण करी ते गोपिका संग....
संगोपन, प्रेम आणि माया भेटली त्यांना यशोदे च्या ठायी,
पण नऊ महिने पोटात ठेऊन देवकी बनली त्यांची आई.....
आठवा पुत्र वासुदेवाचा शोभला, नंदा च्या घरी दिपला,
असत्याचा नाश करण्यासाठी कंसावर कोपला.....
असे माथ्यावर मोरपीस, कंबरेवर बासरी असे,
हातात सुदर्शन चक्र घेऊन, हा सावळ्या वर्णी लोकांच्या हृदयी वसे....
कंसाचा नाश करून, महाभारत घडवलं,
अर्जुनाला सहाय्य करून सत्येला जिंकवलं.....
विराट रूप दर्शन देऊन भक्त अर्जुनास दिपवले,
गीतेतील विचार देऊन आपणास धडे शिकवले......
