टोमणे
टोमणे
का कोणी कोणाला मारावेत टोमणे?
कोणीच नसत perfect, मग का चुकांकडे धावणे?
मुलीना का मिळतात रोजचे टोमणे?
प्रत्युत्तर न देता मनातूनच कोंबणे !
टोमणे ते मोठे स्वप्नं पाहण्याचे,
आणि मग स्वप्नच पाहिले नाहीत त्याचे!
टोमणे ते आडोशाला जाण्याचे,
आणि मग उन्हाची तिरीप अंगावर घेण्याचे!
दुःखी असली तर रडका चेहऱ्याचे टोमणे,
सुखात हसू अनावर झाले तर त्याचे टोमणे!
टोमणे!! टोमणे!! टोमणे!!
शू...
'जोरात बोलायला लागली, मुलगी आहेस 'हे टोमण,
ईतकी अबोल का गं तु? हे एकून परत शांत राहण!
'चार लोक नाव ठेवतील, हे रोजच टोमण,
आणि मनात एक हळुवारपणे डोकावणारा प्रश्न "ही कोण आहेत चार लोक?"आणि परत शांत राहणं..!
