STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Inspirational

3  

Sakharam Aachrekar

Inspirational

नमन या पामराचे

नमन या पामराचे

1 min
281

मधाहून गोड दिली तुम्ही मुखी आज भाषा

तुम्हाच्या कृपेने जाहली धन्य वाचा

तुम्हालागी आज गीत गातो सुरांचे

करा लागू चरणी नमन या पामराचे


तुम्ही वर्णिली महती खरेपणाची

नुरे काही अंती ही शिकवण तुम्हाची

दिवे लावले हृदयी तुम्ही मातृभूचे

करा लागू चरणी नमन या पामराचे


तुम्हालागी उमगली मज ज्ञानवृंदा

अवीट भासते मज ती जणू कस्तुरीगंधा

तुम्ही प्रवाहिले मनी झरे आदराचे

करा लागू चरणी नमन या पामराचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational