म.गांधी
म.गांधी


**
दोन ऑक्टोबरला जयंती
या महान प्रसिद्ध नेत्याची
माला घालूया महात्माजींना
स्मरण करूनी हो प्रेमाची.....
भारताच्या स्वातंत्र्यासाठी
ज्यांनी आपुले प्राण वेचले
ते स्वच्छतेचे ,अहिंसेचे भोक्ते
त्या बापूजींना वंदन आपले....
इंग्रजांविरूद्ध लढा दिला
अनेक मार्गांनी बापूजींनी
सत्याग्रहाने इंग्रजांना नमवले
आपल्याच महान महात्माजींनी...
स्वदेशीचे स्विकार केला त्यांनी
अहिंसा,सत्याग्रह,स्वकष्ट करूनी
तत्वज्ञानाचाही
वापर केला
नजराणा दिला स्वकतृत्वातुनी.....
सूतकताई, गरजेपुरते वस्त्र हे ध्येय
घालवले जीवन त्यांनी आश्रमातुनी
आदर्श बापूजींचा घेवूया आज
आपण महात्मा गांधींच्या प्रेरणेतुनी....
बापूजींच्या भाषणातून मिळते
शिकवण ऐक्याची अन अहिंसेची
अन्यायाविरूद्ध लढा पुकारला त्यांनी
चळवळ केली असहकारतेची.....
वंदन करते आज महान या बापूंना
ज्यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र दिला
समाजहितासाठी लढा पुकारला
सदैव याच कार्याचा गौरव केला.....