पुढं पुढंच जायचं
पुढं पुढंच जायचं
आयुष्यात वाट जरी चुकली तरी
पुन्हा मागे नाही जायचं
ओळखीच्या खुणा शोधत
अनोळखी रस्त्यावर पुढे चालत जायचं...
स्पर्धेच्या अफाट गर्दीत
मागे जरा पडलो म्हणून
निराश नाही व्हायचं
नव्या जोमाने पेटून उठायचं...
जीवन जगण्याच्या वाटेवर
संकटांचे खड्डे बघून
का उगाचं घाबरायचं
अगदी संयमाने संकटांना सामोरे जायचं...
अंधार जरी झाला कधी
भिऊन नाही थांबायचं
मनातील सकारात्मक विचारांच्या
प्रकाशात पुन्हा नव्याने चालायचं...