आस तुझ्या भेटीची
आस तुझ्या भेटीची


हळूच सख्या तू येऊन जा,
बावरे होऊन मला भेटुन जा..
वाऱ्याच्या झुळूकीप्रमाणे,
सहवास तुझा तू देऊन जा..
सुंदर मादक गंध तुझा,
मागे तू ठेऊन जा..
दरवळू दे तो सभोवती,
धुंद मला तू करून जा..
रात्री होई मन माझे कावरे बावरे,
स्वप्नात माझ्या तू येऊन जा..
स्वर्ग वाटे सभोवती सारे,
तुझे असणे तू देऊन जा..
अश्रू दाटले आठवणीत सारे,
त्यांची वाट मोकळी तू करून जा..
पहिल्याच वेळी भेटून,
भेटीची आस तू लावून जा..