बालपण
बालपण
1 min
270
मला आज वाटे
बालपणात रमावे
लहान होऊनी पुन्हा
पाखरासारखे मुक्त जगावे...
बाहुला बाहुलीचे लग्न
पुन्हा एकदा लावावे
लंगडी लगोरी सुरपारंब्या
मनभरुन खेळावे...
खेळता खेळताच
रुसून बसावे
कोणीतरी मग
मायेने समजवावे..
बरसणाऱ्या पावसात
मनसोक्त चिंब व्हावे
आई बाबांनी मग
चांगलेच फैलावर घ्यावे...
आजीनी प्रेमाने
वरणभात भरवावे
रात्र होताच गोष्टी ऐकत
तिच्या कुशीत निजावे...
दिवस हे बालपणीचे
पुन्हा एकदा जगावे
मला आज वाटे
बालपणात रमावे...
