पाऊस
पाऊस
आले भरून आभाळ
पाऊस पडला अंगणी
मन ओलेचिंब झाले
आनंदून गेली ही अवनी
असा बरसला तो
सगळीकडे झाले पाणी
मुले भिजती आनंदाने
गाती गोड गोड गाणी
पाऊस राजा येतो धावुनी
बळीराजाच्या पिकासाठी
लागली रे तुझी आस
धरणीला रे भेटीसाठी
नभ झाकळले सारे
वाट तुझी पाहतो रे
घे कवेत सृष्टीला असा
क्षण सुखाचा मनी साठतो रे