Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Dhumane

Others

3.8  

Chandan Dhumane

Others

बाप

बाप

1 min
248


जन्मदाता बाप । प्रेम सर्वांवरी

कष्ट सदा करी ।आम्हा साठी ।।१।।


पोटास चिमटा ।स्वतःच्या देऊनी ।

मुलांना शिकूनी ।मोठे करी ।।२।।


 कैवल्य अफाट । कर्तव्य अपार ।

लेकीसाठी फार ।जीव तुटे ।।३।।


शिकवण दिली ।त्यांनी संस्काराची ।

सदा जपायाची ।जीवनात ।।४।।


भोगलेत दुःख ।सोसलेत कष्ट ।

लागो नये दुष्ट । आता तरी ।।५।।


त्यांच्यामुळे जगी । आलो भाग्यवान

ठेवा त्यांचा मान । सदोदीत ।।६।।


देऊ प्रेम सदा । त्यांना सांभाळूनी

मिळेल जीवनी ।आशिर्वाद।। ७।।


Rate this content
Log in