विषय -प्रेम
विषय -प्रेम
1 min
350
प्रेम अडीच अक्षरी
मंत्र खरा जगण्याचा ,
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
अर्थ कळे जीवनाचा.
शब्द दोन हे प्रेमाचे
नाती अनेक जोडती,
नात्यातील हा गोडवा
येते आनंदा भरती..
आईबाप जगी श्रेष्ठ
माया हो बहीण देते ,
भाऊ सदा उभा पाठी
जीव सर्वांना लावते..
नाही प्रेमाला उपमा
राधाकृष्ण प्रेम खरे ,
करा प्रेम हो निःस्वार्थी
वाहे प्रेमाचेच झरे...
प्रेम वसे सर्वाठायी
प्रेम करा देवावर ,
सर्व शक्य प्रेमानेच
जग जिंका प्रेमावर..