वृक्ष देती छाया
वृक्ष देती छाया
1 min
450
वृक्ष देती सदा छाया
सर्वांवर माया करी,
फुले ,फळे देती सर्वां
कृपाछत्र सदा धरी .
जीवनात हो वृक्षांचे
जाणा महत्व सर्वांनी ,
प्रत्येकाने एक झाड
लावा आपल्या अंगणी .
शोभा जगी झाडांमुळे
प्राणवायू सर्वां देती ,
अन्न मिळे सर्वांनाच
वृक्ष जीवदान देती ..
झाडे लावा हो जगवा
वसा घ्यावा प्रत्येकाने ,
जीवापाड काळजी घ्या
फुले आयुष्य वृक्षाने ..
झाडे वाचवा सर्वांनी
पृथ्वी वाचवा सर्वांनी ,
तरच फुलेल जग
सुख नांदेल अंगणी .