STORYMIRROR

Chandan Dhumane

Others

3  

Chandan Dhumane

Others

विषय :बळीराजा

विषय :बळीराजा

1 min
296

शेतात राबतोय

जगाचा पोशिंदा हा खरा,

नांगर हाकताना

लागे त्याला घामाच्या धारा .


कष्ट करतो सदा

त्याच्या मनी एकच ध्यास ,

पाऊस बरसावा

असे पीक यावं भरास .


पावसाची पहावी

बळीराजाने किती वाट ,

बिया जळून जाती

असा नको फिरवू पाठ.


 असा बरस रे

 सगळीकडे मेघराजा,

 सुखी कर जगा

आंनदी होई बळीराजा.


Rate this content
Log in