आला श्रावण श्रावण
आला श्रावण श्रावण
आला श्रावण श्रावण
मन ओलेचिंब झाले ,
रिमझिम आल्या सरी
धुंद पावसात न्हाले .
वाट पाहे चातकही
भिजायला पावसात,
खट्याळ रे मेघराजा
असा बरस जोमात .
तुझ्या येण्याने आनंदी
होई जगाचा पोशिंदा ,
साथ देशील का त्याला?
चाले त्याचा कामधंदा ,
राने श्रावणसरींनी
कशी भरुन वाहती ,
माझ्या बळीराजाचे रे
डोळे आनंदे नाहती .
श्रावणात येती सण ,
सख्या आनंदे नाचती ,
झोका झाडाले बांधून
सया गोड गाणे गाती .
राखीपौर्णिमेला येते
मोहराची आठवण ,
भेटीसाठी भावाच्या रे
आतुरते सखे मन .
सुखी ठेव देवराया
सदा माझ्या माहेराला ,
तुझा राहू दे आशिष
येवो उधाण हर्षाला .
