अंधश्रद्धा की श्रद्धा
अंधश्रद्धा की श्रद्धा
मी अहमदनगर जिल्ह्यातील माझी लहानपणापासून फक्त न फक्त रेणूका मातेवर अपार श्रद्धा आहे.अंधश्रद्धा नाही हं. मी असा अनेक वेळा अनुभव घेतला की माता नेहमी माझ्या पाठीशी असते व तिच्यामुळे मला खूप उभारी मिळते.त्यातीलच एक प्रसंग मी सांगणार आहे.
जवळ जवळ सात वर्षापूर्वीची गोष्ट असेल विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या.मलाही आँर्डर आली ,प्रशिक्षण झाले. निवडणुकीच्या एक दिवस आधी आम्हाला आँर्डर मिळाली मला कोपरगावचे शेवटचे गाव उक्कडगाव मिळाले. जवळजवळ कोपरगावपासून २७किमी असेल.
मी माझ्या टीममधील संचालक व इतर अधिकारी यांना भेटले ते म्हणाले ,ताई तुम्ही डायरेक्ट उद्या या गाव लांब आहे. मी मग आनंदाने घरी आले
खर तर गाव लांब होते पण मला आनंद झाला की उक्कडगावच्या श्री रेणुकामातेचे मला दर्शन होईल मला वेळ मिळाला तर देवीला जाऊन येईन.
सकाळी मी सहा वाजताच घरातून टू व्हीलर वरून निघाले . रस्त्यात रेल्वे फाटकात अडकले व मतदान केंद्रात पोहचायला मला सात वाजले व नंतर तुफान मतदान असल्याने मला देवीला जायला वेळच नाही मिळाला .अक्षरशः जेवायलाही वेळ नव्हता खूप गर्दी होती. जवळपास सात वाजता मतदान संपले.उक्कडगाव ते कोपरगाव रस्ता खूप खराब .दुतर्फा दाटा झाडी सात नंतर निर्जन रस्ता चोरांचा सुळसुळाट व अशा रस्त्याने एकट्या महिलेने प्रवास करणे अगदी धोक्याचे. मतदान केंद्रावरन आठ वाजता निघाले बाकीचे सगळे बसने येणार होते .सोबत कोणीच नाही. य
मी फक्त लांबूनच देवीच्या दिशेने नमस्कार केला व तिला मला एकटीला एवढे अंतर कापण्यासाठी माझ्या पाठीशी रहा अशच विनंती केली. मी पूर्ण तोंड स्कार्फने बाधून घेतले व गाडी चालू केली फक्त देवीचा धावा केला व कुठेही न पाहता मी निघाले व मलाही समजले नाही की एवढा धोकादायक रस्ता कसा पार केला व कोपरगाव आल्याचे लक्षात आले तेव्हा मला हायसे वाटले.कारण खरच माझी माता माझ्या पाठीशी होती.नक्कीच ही माझी श्रद्धा व सकारात्मकता होती. अंधश्रद्धा नक्कीच नाही.
