हृदय
हृदय
1 min
375
'हृदय' भेट ईश्वराची
लाभली हा प्राणीमात्रांना
प्रत्येक ह्रदय एकच
भासते वेगळे सर्वांना.
आमच्या हृदयात आत्मा
अनंत अनादी जीवात्मा,
जुळूनी हृदयांतरी हो
संगम होई परमात्मा.
प्रत्येक हृदयात आहे
ईश्वरी अंश हा भरून,
करावे प्रेम सर्वांवर
जीवन घ्यावे हो जगून,
सदैव ठेवा प्रेमभरे
आपले हृदया स्वच्छंदी ,
करावी सदा भूतदया
ईश्वर होईल आनंदी .
संवाद ठेवा गोड येथे
हृदय जोडा हृदयांशी
अवीट नाती अनामिक
जोडावी सर्व माणसांशी
