Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Dhumane

Others

3  

Chandan Dhumane

Others

सिद्धीविनायक

सिद्धीविनायक

1 min
408


श्री क्षेत्र सिद्धेश्वराची Iसिद्धीविनायक कथा I

ऐकून जाईल व्यथा I भक्तजन गाती ॥१॥


ब्रम्हदेवाने हो केली I जेव्हा सृष्टीची निर्मिती I 

तपस्येने गणपती Iप्रसन्न हो झाले ॥२॥


ब्रम्हदेवाला हो वर Iसृष्टीच्या निर्मितीसाठी I

जगत कल्याणासाठी Iदिला गणेशाने ॥३॥


सृष्टी निर्मितीच्या वेळी I विष्णूदेव निद्राधीन I

कानातून हो निर्माण I मधू कैत्यभ दैत्य॥४॥


देवी देवतांना छळे Iविष्णू मारीती दे त्यास I

न मारु शकले त्यास Iकिती हे प्रयत्न ॥५॥


ओम गणेशाय नमः Iजप केला श्रीविष्णून I

 सिद्धटे की हो जाऊन I झाली सिद्धी प्राप्त ॥६॥


केला संहारा दैत्याचा । स्थापन झाले गणेश ।

सिद्धिविनायक ईश। दुसरा गणेश ।।७॥


 स्वयंभू मूर्ती तीन फूट Iउत्तराभिमुख मूर्ती I

अष्टविनायकापैकी Iसिद्धटेकी स्थित ॥८॥


Rate this content
Log in