आई कुठं काय करते..!
आई कुठं काय करते..!
कोणाला काय हवय काय नको,
सगळच की ग तू पहाते.
कोण म्हणत आई कुठ काय करते?
लहान थोरासहीत सगळेच बिझी,
म्हणे प्रत्येक जण वस्तू ही माझी।
घरात आईचं फक्त अस्तित्व असतं,
तिचं म्हणून खरंच, काहीच नसतं
शामचा रवी, रामचा पवी बापाचा शिक्का असतो,
हक्क आईचा तिथं काहीच नसतो
लेकरा बाळांसाठीच ती रातदिन झुरते,
कोण म्हणत, आई कुठ काय करते
कोंबड्याच्या बांगेची वाट नाही बघत
एकटीच लढते ती, ना कुणाची मदत।
चूल आणि मूल एवढच तिचं आकाश
अंतरंग जीवनाचे, उदास अन भकास
सुर्योदय ते सूर्यास्त तिची ठरलेली ड्युटी
एक तरी लाभावी लेकरांची मिठी।
ओढत प्रपंचाचा गाडा मर मर मरते,
कोण म्हणतं आई कुठ काय करते ।।
प्रपंचाचा गाडा नेटाने ओढते,
सर्वांच्या सुखाची प्रार्थना मनोभावे करते।।
हात जोडून सांगतो मायबापा,
इतरांसारखं आईबाला ही जपा।
राब राबूनहो तिच आयुष्य सरते,
कोण म्हणतं आई कुठं काय करते।।
कोणाला काय हवय काय नको,
सगळंच की गं तू पहाते,
कोण म्हणतं आई कुठं काय करते।।