STORYMIRROR

शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे

Inspirational Others

3  

शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे

Inspirational Others

राजमाता जिजाबाई

राजमाता जिजाबाई

1 min
237

शौर्य आणि दूरदृष्टी

रूप तिचे भरदार

घोडेस्वारी , तलवार

पारंगत असे नार...!!१!!


असे लेक जाधवांची

भोसलेंची झाली सून

दिला जन्म शिवबाला

आनंदीले प्रजाजन....!!२!!


बालपणी दिले त्यांस

शक्ती युक्तीचे हे धडे

कथा सांगती शौर्याच्या

जुने पराक्रम बडे....!!३!!


स्वराज्याची शिकवण

बिंबवली त्यांच्या मनी

राजमाता जिजाबाई

धन्य असे ती जननी.....!!४!!


स्वराज्याच्या रक्षणास

झाला शिवबा तयार

सोबतीला हे मावळे 

केला शत्रूवर वार....!!५!!


राजमाता जिजाबाई

स्वप्न मनी स्वराज्याचे

केले स्वराज्य ते खडे

ऋण फेडीले मातेचे....!!६!!


राजमाता जिजाबाई

तुम्हा मानाचा मुजरा

स्वराज्याला दिला तुम्ही

एक तेजोमय हिरा.....!!७!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational