STORYMIRROR

शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे

Inspirational

3  

शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे

Inspirational

सावित्रीची लेक तू

सावित्रीची लेक तू

1 min
979

आजच्या प्रत्येक स्त्री मध्ये

 दडली आहे एक सावित्री

खोल अंतर्मनात बघ डोकावून

तुला ही याची होईल खात्री


जाणून घे , समजून घे

तुझ्याच मनातील सल

ढवळून बघ एकदा

तुझ्याच मनाचा तळ


अस्तित्व तुझे तुला

तिथे नक्कीच सापडेल

तेव्हा येथे पुन्हा पुन्हा

एक नव्याने सावित्री घडेल


शोध त्या सावित्रीचा

तुझा तुलाच घ्यावा लागेल

आठवून बघ तिला एकदा

तुझ्यातली सावित्री नक्की जागेल


घडवुनी नवा इतिहास

चढ यशाचे शिखर

त्याच सावित्रीची लेक तू

चल आज हे सिध्द कर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational