STORYMIRROR

शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे

Others

3  

शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे

Others

तीला काही सांगायचे

तीला काही सांगायचे

1 min
251

इतिहास आहे साक्ष

तिच्या कर्तृत्वाची गाथा

तीला काही सांगायचे

आज मनातील व्यथा


घ्यावा मोकळा श्वास मी

तिला वाटे पुन्हा पुन्हा

स्वतःसाठी जगणे हा

तर नाही मोठा गुन्हा


मग का ? तिच्या घालती

पायी बेडी बांधनांची

कधी केली जाते होळी

फक्त तिच्याच स्वप्नांची


पंख तिचे हे छाटले

उंच उडण्या आधीच

दुःख तिच्या काळजाचे

नाही कळले कधीच


उरी भावना घेऊन

मनी आजही झुरते

सल तिच्या मनातली

डोळ्यांतून पाझरते


Rate this content
Log in