आधारवड
आधारवड
माय माझी घराचा
झाली आधारवड
सुख दुःखाची आजवर
एकटीनेच वाहिली कावड
चार लेकरं पदरी
त्यात कुकु तीच रुसलं
ओंजळीतलं सुख तिच्या
दूर जाऊन बसलं
खचली नाही माय
संकटाना होती तुडवत
दुःखातही सुखाने
आम्हाला होती घडवत
अश्रू तिच्या डोळ्यातला
कधीच नव्हता ढळत
खचणारी माय माझी
कुणालाच नव्हती कळत
आधारवड होऊन
माय माझी झिजली
चंदनरूपी काया तिची
आमच्यासाठी कुजली
