आयुष्य एक रंगमंच
आयुष्य एक रंगमंच
आयुष्याच्या रंगमंचावर
आपण सारे कलाकार
भूमिका मात्र वेगवेगळी
पाडायची असते पार
आयुष्याच्या प्रवासात
येती संकटे व अडचण
धैर्याने मात करावी
न डगमगता आपण
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
स्वप्न करावीत साकार
आयुष्याला द्यावा
एक नवा आकार
भूमिका पार पडताना
उत्तम करावे सादरीकरण
शेवटच्या क्षणी प्रत्येकाचे
भरून यावे अंतःकरण
