STORYMIRROR

शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे

Children

3  

शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे

Children

बालपण

बालपण

1 min
216

९ महिने ९ दिवस होती एकाच क्षणाची वाट

टाहो फोडून जगात घेतला पहिला श्वास 


आईचे मायेची ऊब पित्याचे प्रेमळ रूप

घरातल्या सगळ्यांचे आपण लाडके असतो खूप


दुडू दुडू पावले टाकत सुरू होते बालपण

प्रत्येक स्पर्शात असते प्रेम आणि आपलेपण


सगळेच पुरवितात आपले लाड आणि हट्ट

यासाठी करावा लागत नाही कुठलाच त्याग आणि कष्ट


आईच्या हातची खिमटी आणि मऊ मऊ भात

रोज निजवते आपल्याला गोड अंगाई गात 


बाबा आणतात रोज गोड गोड खाऊ

मित्र असतात आपले तेव्हा चिऊ मऊ काऊ 


आजी आजोबा रोज छान छान गोष्टी सांगतात 

ताई दादा काका मामा रोज कॅडबरी चॉकलेट आणतात

 

तेव्हा नसतो अभ्यास नसतात कुठल्याच परीक्षा

कुठल्याच चुकीची तेव्हा मिळत नाही शिक्षा


नसते कसलेच टेन्शन नसते कसले दडपण

आनंदात आणि सुखात सरत असते बालपण


आयुष्याच्या पुस्तकात बालपणाचा सुखद असतो ठेवा 

म्हणून प्रत्येकजण म्हणतो पुन्हा बालपण देगा देवा 

पुन्हा बालपण देगा देवा................................



Rate this content
Log in

Similar marathi poem from Children