एकदा काय झाले
एकदा काय झाले
1 min
506
एकदा काय झाले पाहा
लांडोरीने उघडले पार्लर
मोठा बोर्ड लावला बाहेर
केली ताठच तिने कॉलर
पहिले गिऱ्हाईक कावळा
बोलले मला व्हायचे गोरे
घ्या किती तुम्ही पैसे फीचे
पण काळ्याचे करा पांढरे
लांडोरीने चोपडला शाम्पू
लावले बरेच फेशियल क्रीम
काळा रंग बदललाच नाही
आणे दुकानचा साबण वीम
घास घास त्याला घासून
पंख केले तिने भरपूर ओले
कावळ्याला भरली हुडहुडी
कापरे भरले आणि तो बोले
माफ कर बाई लांडोरीताई
नाहक भूललो व्हाया गोरे
देवाजीनेच बनवले काळे
तेच वाटतेय आम्हांस प्यारे
