कवितेचं काळीज तू
कवितेचं काळीज तू
स्वप्न तुझे माझें
असेल कसे वेगळे
माझ्या प्रत्येक कवितेचे
तू शब्द आहेस सगळे
कवितेचं काळीज तू
तूच कवितेचा श्वास
मांडताना प्रत्येक शब्द
होतो तुझाच भास
कसे मांडू ऋण शब्दांत
हे शब्द तुझीच देणं
श्वास श्वासात भरण्याआधी
मी होते फक्त मेण
श्वास तुझा तू घेत रहा
कविता माझी जिवंत राहील
तुझ्याविना कविता ,कवयित्री
दोघींचेही दफन होईल
तुझी राणी
तुझ्याविना जिची अधुरी लेखणीची कहाणी
