एक कविता माझ्यासाठी
एक कविता माझ्यासाठी
मी रोज त्याला विचारायची
एक कविता माझ्यासाठी
सांग कधी लिहिणार
मी विषय काढला कि
तो मुदाम विषय टाळणार
कधी लिहिणार सांग कविता
म्हणून आज त्याच्याशी भांडले
तो हसत म्हणाला अग वेडे ,
माझ्या प्रत्येक कवितेत
तुलाच तर मी मांडले
माझी प्रत्येक कविता
तू काळजातून वाचशील का
श्वास बनून माझ्या
काळजात तू साचशील का
मग त्याची एक एक कविता मी
मन लावून वाचत गेले
कवितेचा प्रत्येक शब्द वाचुन
पाणी डोळ्यात साचत गेले
त्याच्या प्रत्येक कवितेत
तो मलाच तर मांडत होता
प्रेम काळजात गोठवून
कागदावर सांडत होता
निःशब्द होऊन तेव्हा
मी त्याच्याकडे बघत राहिले
त्याच्या पाणावलेल्या डोळ्यात
मी निःस्वार्थ प्रेम पाहिले
