खटला
खटला
रस्त्यावरून ती , एकटीच जात आहे
अंधार पाहून जरा , मनात भीत आहे
नसे कोणी दूरदूर , वाटेवरी त्या आज
काळीज आता तिचे , जरा काचरत आहे
अचानक आला ,वाटेत आडवा कोणी
अडकली नौका , जणू वादळात आहे
टाकला हात त्याने, तिच्या अब्रूवरती
वाचवा वाचवा असा, ती टाहो फोडत आहे
करुनि अब्रूची होळी, तो गेला निघून कोठे
रक्ताच्या थारोळ्यात, ती पडली निपचित आहे
आझाद फिरतो नराधम,सवजाच्या शोधात
वर्षोनुवर्षे खटला, न्यायालयात सडत आहे
कित्येक विझल्या पणत्या ,वासनेच्या पिंजऱ्यात
कुठे कुणा निर्भयाला , इथे न्याय मिळत आहे
