काळाचा घाव दिला
काळाचा घाव दिला
पहाटेस त्या
खंत कशी नाही
काळजी वाही
मेघराजही
उमालली ती
बहरली नाही बाग ही
कशी आग ही
पेटवली ही
कोवळी होती
अजुनी बालकांची कांती
पसरली शांती
मरणाची ती
एकाच वेळी
दहन केलंस जीवन
जन्मास मरण
वाटे दिलेसी
भुल काय ती
कळली नाही मज
बालकांस काज
भक्षिले तुही
दु:ख काय ते
काळीज मायेचं रडवुन
पान्ह्यास आटवून
जगावं कसे
आज काळ तो
असा भयंकर आला
नवजात लीला
जाळुनी गेला
अभिशाप का
शाप काय होते
प्राक्तन साहते
आईचे मन
सांत्वन दाटले
बोल कसे बोलवे
दु:खही सहावे
त्या माऊलींनी
कालचा घात
काळाचा घाव होता
आक्रोश होता
चिमुकल्यांचा
