STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Crime Fantasy

3  

shubham gawade Jadhav

Crime Fantasy

आत्महत्या

आत्महत्या

1 min
197

तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला 

तुला तुझ्या आई - बापानी 

 कोणताही विचार न करता क्षणात 

संपवलीस तू स्वतःची कहाणी 


स्वतःचे स्वप्न त्यांनी तुझ्यात पाहिले 

९ महिने पोटातं आईने सांभाळले 

रक्ताचं पाणी बापाने तुझ्यासाठी केले 

तूच त्यांचा मार्ग एकला हे तुला का ? नाही कळले 


अरे खुश झाला होता बाप तुझा 

जेव्हा तू हाताखाली आलास 

पण तोंड झोडून घेत होता तो येड्यासारखं 

जेव्हा तू त्यांना असा सोडून गेलास 


त्या चिमुकल्या बहिणीने आता 

राखी कोणाला? बांधायची 

तुला आठवून सारखी रडते बसते 

धार तुटत नाही डोळ्यातल्या अश्रूंची 


तू गेल्यापासून आई काहीच खात पीत नाही 

तासंतास तुझीच वाट बघत बसते 

वाटेवरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकात 

ती वेड्यासारखी तुलाच शोधत असते 


तुझ्या हातून मरताना त्यांनी पाणी प्यायचं 

सोडून तुलाच त्यांना पाणी पाजाव लागलं 

जळत होतास तू त्यांच्या समोर तेव्हा 

त्यांनी जिवंतपणीच नरक भोगलं 


 तीन जिवंत पुतळे तू इथच ठेऊन 

 घाई केलीस एकट्याने जायची 

 ओरडून ओरडून विचारत होती आई तुझ्या मढ्याला 

हिंमत कशी झाली तुझी आत्महत्या करायची? 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime