STORYMIRROR

Mala Malsamindr

Action Crime Inspirational

3  

Mala Malsamindr

Action Crime Inspirational

निर्भया

निर्भया

1 min
12.2K

आजची निर्भया तोडून टाक तू शृंखला 

चिरून टाक नराधमाचा त्या पाखंड

आणि तूच चरित्र तुझे जप अखंड

तू स्वत:च स्वतःचे रक्षण कर 


तुझ्या नकारावर जे तेजाब टाकतात 

हैवान बनवून तुला ते लोचतात

तुला पायाखाली चुरगाळून टाकतात 

तुझ्या कौमार्याचे धिंडवडे काढतात


शरीराच्या तुझ्या चिंधड्या करतात

रक्तारक्तात ते तुला माखतात 

तन मनाची चाळणी करतात 

आणि अर्धमेलं करून सोडून जातात 


नाहीतर रॉकेल टाकून जीवे मारतात 

या वेदना तूच का सहन करतेस

हा त्याचा अत्याचार का तू झेलतेस

दुःखाच्या पहाडाने का तू चेंगरतेस


पिढ्यानपिढ्या तूच का अत्याचार सहतेस

बन तू निडर कर त्या नराधमाचा खात्मा 

आनंदी आनंदाने सुमने उधळेल मग बघ

मेलेल्या त्या निर्भयाचा आत्मा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action